इंदापूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे एका लग्नात बनले नवरदेवाचे मामा…

मुलाला सख्खे मामा नाहीत म्हणून दत्तामामांनी नवरदेवाच्या पाठीमागे उभा राहून मामाचं कर्तव्य बजावलं.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे एका लग्नात बनले नवरदेवाचे मामा…

मुलाला सख्खे मामा नाहीत म्हणून दत्तामामांनी नवरदेवाच्या पाठीमागे उभा राहून मामाचं कर्तव्य बजावलं.

इंदापूर; बारामती वार्तापत्र 

संपूर्ण राज्यामध्ये ‘मामा’ नावाने ओळखले जाणारे इंदापूरचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे… दत्तामामा लोकांना किती कनेक्ट आहेत, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. मुलाला सख्खे मामा नाहीत म्हणून दत्तामामांनी नवरदेवाच्या पाठीमागे उभा राहून मामाचं कर्तव्य बजावलं. राज्यमंत्र्यांच्या या कृतीची राज्यभरात एकच चर्चा होत आहे.

इंदापूर तालुक्यातील सराटी येथील एका विवाह समारंभाला दत्तात्रेय भरणे यांनी हजेरी लावली. सराटी येथील भैय्यासाहेब कोकाटे यांच्या लग्न समारंभाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते. नवरदेवाला सख्खा मामा नसल्याने तुम्हीच नवरदेवाचे मामा व्हा, अशी विनंती कोकाटे कुटुंबाने राज्यमंत्र्यांना केली. त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता कोकाटे कुटुंबीयांच्या विनंतीला मान दिला.

भैय्यासाहेब उर्फ प्रकाश यांचं लग्न लागत असताना स्वतः नवरदेवाच्या मागे उभा राहून राज्यमंत्री भरणे नवरदेवाचे मामा बनले आणि त्यानंतर वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले. दत्तामामांचा साधेपणा उपस्थित लोकांना प्रचंड भावला. या लग्नसमारंभाचा आणि दत्तामामांच्या साधेपणाचा व्हिडीओ अगदी काही वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला.

 

दत्तामामांचा साधेपणा आणि कुटुंबीयांच्या विनंतीला दिलेला मान पाहून वधू आणि वरपक्षही भलता खुश झाला. आमच्या सुख दु:खात मामा असेच उभे असतात. आजही आमच्या आनंदाच्या प्रसंगात दत्तामामांनी आमची साथ निभावली, अशा भावना दोन्ही कुटुंबियांनी व्यक्त केल्या.

दत्तामामा हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या अडअडचणी सोडवण्याचं हक्काचं ठिकाण. अडचणी सांगाव्यात आणि मामांनी त्या झटकन सोडवाव्यात हा शिरस्ता गेले अनेक वर्ष सुरु आहे. आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या, मतदारसंघातील लोकांच्या सुख दु:खाच्या प्रसंगात दत्तामामा सहभागी होत असतात.

दरम्यान, अनेक प्रसंगातून भरणेंची संवेदनशीलता समोर आली आहे. मागील काळात अपघातग्रस्तांना आपल्या गाडीतून दवाखान्यात नेतानाचे दत्तामामांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या त्या प्रसंगी त्यांचं वागणं अतिशय साधं असतं परंतु त्यानंतर त्यांच्या वागण्याची चर्चा संबंंध राज्यभर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram