बारामती ‘ रोटरी क्लब ‘ बेस्ट क्लब इन डिस्ट्रिक्ट,बेस्ट सीएसआर प्रोजेक्ट पुरस्काराने सन्मानित
कोवीड 19 च्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका क्लबने बजावली होती.
बारामती ‘ रोटरी क्लब ‘ बेस्ट क्लब इन डिस्ट्रिक्ट,बेस्ट सीएसआर प्रोजेक्ट पुरस्काराने सन्मानित
कोवीड 19 च्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका क्लबने बजावली होती.
बारामती वार्तापत्र
अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बारामती रोटरी क्लबने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची दखल घेऊन बारामती रोटरी क्लब ला पुरस्काराणे गौरविण्यात आले आहे.
पुण्यात झालेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 पुरस्कार वितरण कार्यक्रमात बारामती रोटरी क्लब बेस्ट क्लब इन डिस्ट्रिक्ट आणि बेस्ट सीएसआर प्रोजेक्ट या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा कार्यक्रम माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रवी धोत्रे व रोटरी क्लब चे इंटरनॅशनल डायरेक्टर महेश कोटबागी यांच्या उपस्थितीत पार पडला.
रोटरी क्लबचे तत्कालीन अध्यक्ष व सीए प्रतिक दोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बारामती रोटरी क्लबच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. कोवीड 19 च्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका क्लबने बजावली होती. तसेच वेगवेगळ्या माध्यमातून उपक्रम राबवले होते. त्यामुळे बारामती रोटरी क्लब च्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे समाजाच्या सर्वस्तरातून रोटरी क्लबचे अभिनंदन होत आहे.