मुंबई

‘सौं ‘च्या गायनावर उपमुख्यमंत्र्यांनी दिली हसून ‘ दाद ‘

कौटुंबिक कार्यक्रमात पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र

‘सौं ‘च्या गायनावर उपमुख्यमंत्र्यांनी दिली हसून ‘ दाद ‘

कौटुंबिक कार्यक्रमात पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र

बारामती वार्तापत्र

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना आपण नेहमी गंभीर पाहतो. मात्र काल एका कौटुंबिक कार्यक्रमात अजित दादा पवार हे दिलखुलास झालेले पाहायला मिळाले. अजित दादा पवार यांच्या भगिनी नीता ताई यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कौटुंबिक सोहळ्यादरम्यान वाढदिवसाचे औचित्य साधून कुटुंबातील सदस्यांनी जुन्या काळातील वेगवेगळे गाणी गायनातून नीता ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यादरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सौ सूनेत्राताई पवार यांच्या गायनावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांनी दिलखुलास हसून दाद दिली. हा व्हिडीओ सुप्रियाताई सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे दादांच्या चाहत्यांना दादांची ही हास्यमुद्रा आकर्षित करणारच

पवार कुटुंबियांचा कोणताही कार्यक्रम असो सर्व कुटुंबीय एकत्र येतात. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. दिवाळी, पाडवा ,वसुबारस हे कार्यक्रम देखील पवार कुटुंबीय मोठ्या उत्साहाने एकत्र येत साजरे करत असतात. त्यानिमित्ताने आपल्या संस्कृतीची जपनुकही ते करत असतात.

या कार्यक्रमाला खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सौ सूनेत्रा ताई पवार, बंधु श्रीनिवास पवार , सौ शर्मिला पवार आणि ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रमुख सुनंदा पवार ,रणजित पवार यांच्यासह पवार कुटुंबीय उपस्थित होते.

Related Articles

Back to top button