ग्रामपंचायत निवडणुकीत जात पडताळणी अर्जाला मुदतवाढ
अर्ज स्वीकारणारे टेबल वाढवून अर्जदारांचे अर्ज स्वीकारे पर्यंत कार्यालय सुरू ठेवावेत अशा सूचना देखील दिल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत जात पडताळणी अर्जाला मुदतवाढ
अर्ज स्वीकारणारे टेबल वाढवून अर्जदारांचे अर्ज स्वीकारे पर्यंत कार्यालय सुरू ठेवावेत अशा सूचना देखील दिल्या आहेत.
बारामती वार्तापत्र
राज्यात एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या दरम्यान मुदत संपणाऱ्या 14234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
30 डिसेंबर ही नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख आहे
तर 31 डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आणि अर्जाची छाननी करण्याची मुदत आहे.
चार जानेवारीला निवडणुकीस उभ्या असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
यासाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान आहे.
या निवडणुकीत उमेदवारांना अर्ज भरताना जात पडताळणीसाठी अर्ज करावा लागत आहे.या अर्जांची संख्याचा वाढता विचार करता ऑनलाइन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. त्यामुळे जात पडताळणी साठी मुदतवाढ देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. दिनांक 29 डिसेंबर व 30 डिसेंबर या दोन दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने जात पडताळणीचे अर्ज स्वीकारावेत अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व कार्यालयांना दिले आहेत.
त्यामुळे अर्ज स्वीकारणारे टेबलवर कर्मचाऱ्यांनी पूर्ण वेळ व पूर्ण क्षमतेने काम करुन अर्ज दाखल करून घ्यावेत.
हे अर्ज दाखल करत असताना कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी.
गरजेनुसार पोलीस विभागाची मदत घ्यावी.
अर्ज स्वीकारणारे टेबल वाढवून अर्जदारांचे अर्ज स्वीकारे पर्यंत कार्यालय सुरू ठेवावेत अशा सूचना देखील दिल्या आहेत.
त्यामुळे निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्रा साठी काही दिवसांचा अवधी मिळाला आहे. त्यामुळे काही अंशी उमेदवारांचे टेन्शन कमी झाले आहे.