स्थानिक

नगरपालिका चोरीचा लागेना ‘ छडा ‘नक्की कोणी मारला ‘ खडा ‘

सामान्य माणसाच्या कराचा पैसा नगरपालिकेकडे सामान्य माणूस कर रूपाने पैसे भरत असतो.

नगरपालिका चोरीचा लागेना ‘ छडा ‘नक्की कोणी मारला ‘ खडा ‘

सामान्य माणसाच्या कराचा पैसा नगरपालिकेकडे सामान्य माणूस कर रूपाने पैसे भरत असतो.

बारामती वार्तापत्र

26 मार्च 2019 रोजी रात्री बारामती नगरपालिकेच्या मुख्यालयातून सोळा लाख 24 हजार रुपयांची रोकड अज्ञाताने चोरी केली होती. या चोरीचा छडा अजून लागेना त्यामुळे नक्की हा काय प्रकार आहे. निदान या येणाऱ्या नवीन वर्ष 2021 मध्ये तरी या प्रकरणाचा छडा लागणार का याविषयी नागरिकांमधून बोलले जात आहे.

चोरीच्या घटनेला 21 महिने पूर्ण

26 मार्च 2019 साली नगरपालिकेत झालेल्या चोरीला आज 21 महिने पूर्ण झाले आहेत. मात्र या चोरी प्रकरणा चा छडा लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे.
जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे डॉअभिनव देशमुख यांनी स्वीकारल्यापासून जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची, त्यातही बारामती पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. मात्र इतके कर्तव्यदक्ष अधिकारी असतानाही या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश का येत आहे.

नगरपालिकेची सुसज्ज इमारत व त्यात असणारी सर्व यंत्रणा ही उच्च दर्जाची असणार यात शंकाच नाही मात्र चोरी झाली त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते असे सांगितले जाते. त्याचबरोबर गेटवर सुरक्षारक्षक तैनात असतानाही हा प्रकार घडला.

विरोधी पक्षांनी केले होते आंदोलन

बारामती नगर परिषदेच्या चोरीच्या घटनेचा छडा लागत नाही.म्हणून नगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपरिषदे समोर उपोषणही केले होते. तसेच राज्याचे पोलीस महासंचालक यांनाही या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले होते मात्र कोणतीच मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही व प्रकरण प्रलंबित राहिले.

काही रक्कम ठेवली परत

26 मार्च 2019 रोजी 16 लाख 24 हजार रुपयांची रोकड चोरी झाली होती. मात्र घटनेच्या दोन दिवसांनी साधारण साडेतेरा लाख रुपये असलेली एक बॅग परत कार्यालयात आणून ठेवण्यात आली. ही रक्कम आणून ठेवत असतानाचा प्रकारही कोणाच्या लक्षात येऊ नये ही शोकांतिका आहे. चोरी झाल्यानंतरही नगरपालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे चालू केले नाहीत व सुरक्षा वाढविली नाही हेच यावरून सिद्ध होते.

सामान्य माणसाच्या कराचा पैसा नगरपालिकेकडे सामान्य माणूस कर रूपाने पैसे भरत असतो. मात्र या पैशावरच डल्ला मारला जातो आणि तोही उघडकीस येत नाही याला काय म्हणावं ?अशीच दुसरी घटना वीर सावरकर जलतरण तलाव येथे सहा एप्रिल 2019 रोजी घडली त्या ठिकाणचे 69 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेले. नगरपालिकेची चोरी व वीर सावरकर जलतरण तलाव याठिकाणी झालेली चोरी व जवळपास दहा-बारा दिवसांच्या अंतराने झालेली ही चोरी हा सुद्धा आता चर्चेचा विषय झाला आहे.

कायम वादाच्या भोवऱ्यात असलेला जलतरण तलाव व नगरपालिका या दोन्ही संस्थांवर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वरचष्मा आहे. या जलतरण तलावा शेजारीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वडिलांच्या नावाने असणारे अनंतराव पवार व्यायाम शाळा देखील आहे. निदान याठिकाणी तरी अजितदादांचे लक्ष जाणार का आणि येणाऱ्या नवीन वर्षात तरी चोरीचा छडा लागणार का?
तलावाच्या ( संस्थेच्या ) वतीने आढावा बैठक घेतली जाते त्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित दादा उपस्थित असतात.या तलावाची वार्षिक मीटिंग 1 मे रोजी असते.या तलावावर काही मर्जीतल्या लोकांचीही ये-जा असते.
covid-19 च्या कालावधीत तर लॉक डाउन असतानाही हा तलाव काही मूठभर लोकांकरिता चालू ठेवण्यात आला होता. संपूर्ण राज्य बंद असताना नियमांचे उल्लंघन करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वर्चस्वाखालील संस्थेत नियमांची पायमल्ली केली जात होती.
स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे लॉकडाउनच्या कालावधीत नियमांचे पालन करत होते. मात्र ही संस्था ठराविक लोकां साठी चालू होत ती त्याविषयी बारामती वार्तापत्र ने बातमी च्या स्वरूपात आवाज उठवला होता.

पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे हे आव्हान स्वीकारणार का?

नगरपालिका व वीर सावरकर जलतरण तलाव या ठिकाणच्या दोन्ही चोरीच्या घटनांना कमीजास्त फरकाने एकवीस महिन्यांचा अवधी उलटून गेला आहे.मात्र तरीही पोलिसांना या चोरीचा छडा लावण्यात अपयश येत आहे.
त्यामुळे नुकतेच पदभार स्वीकारलेले बारामतीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे हे आव्हान स्वीकारणार का असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram