बारामती कोरोणाचे आज 19 रुग्ण
रुग्णात ग्रामीण ची संख्या वाढली
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोणाचे 19 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.कालच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत आज तीन रुग्णसंख्या कमी आहे. मात्र ग्रामीण भागात शहराच्या तुलनेने कोरोणाचे पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत.
आजच्या शासकीय rt-pcr 91 नमुन्यांमध्ये 10 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत
तर तालुक्यातील खाजगी प्रयोग शाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 16 नमुन्यांपैकी 3 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत
तर एंटीजन च्या 30 नमुन्यांपैकी 6 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे एकूण 19 इतकी रुग्णसंख्या आजची झाली आहे.
आजपर्यंत बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 5777 तर बरे झालेले रुग्ण संख्या 5480 आणि एकूण मृत्यू 137 अशी आकडेवारी आहे.
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा काळजी घ्या ,घाबरू नका मास्क लावा ,सॅनिटायझर चा वापर करा ,अनावश्यक गर्दी टाळा