टेक्निकल विद्यालयातील कु.अथर्व घुले याची यंग सायंटिस्ट(Scientist)म्हणून निवड
संपूर्ण भारतातून 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी गेले सहा महिने isro च्या शास्त्रज्ञानशी झूम मीटिंग व वेबिनार द्वारे संपर्कात होते.
टेक्निकल विद्यालयातील कु.अथर्व घुले याची यंग सायंटिस्ट(Scientist)म्हणून निवड
संपूर्ण भारतातून 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी गेले सहा महिने isro च्या शास्त्रज्ञानशी झूम मीटिंग व वेबिनार द्वारे संपर्कात होते
बारामती वार्तापत्र
रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय बारामती या विद्यालयातील इ 10 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अथर्व दिलीप घुले या विद्यार्थ्यास नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्ट इंडिया एपीजे अब्दुल कलाम कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट इंडिया रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन इंडिया यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या इंडिया इंटरनॅशनल साराभाई स्टुडन्ट सायंटिस्ट अवॉर्ड 2020 प्राप्त झाला आहे.त्याची यंग सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे.
संपूर्ण भारतातून 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी गेले सहा महिने इस्रोच्या शास्त्रज्ञाशी झूम मीटिंग व वेबिनार द्वारे संपर्कात होते.त्यापैकी 63 विद्यार्थी सुरुवातीला निवडले गेले व अंतिम अवॉर्ड कार्यक्रमात 13 व्या क्रमांकाने यंग सायंटिस्ट म्हणून अथर्व घुले हा निवडला गेला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी विज्ञान क्षेत्रात पाठीमागे नाहीत.आवड ,आत्मविश्वास, जिद्द,चिकाटी,नवनवीन माहिती जाणून घेण्याची आवड असेल तर यश निश्चितच मिळते,असे प्रतिपादन विद्यालयाचे प्रा.श्री राजेंद्र काकडे यांनी केले.
प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मा. श्री सदाशिव (बापूजी) सातव,प्रा.राजेंद्र काकडे,अर्जुन मोहिते,श्री विष्णू बाबर,बंडू पवार,अर्जुन मलगुंडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथर्वचे अभिनंदन केले. अथर्वच्या पुढील वाटचालीस बारामती वार्तापत्र च्या वतीने हार्दिक शुभेच्छा