युरोप, दक्षिण आफ्रिका देशातून आलेल्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या अनुषंगाने
युरोप, दक्षिण आफ्रिका देशातून आलेल्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या अनुषंगाने
पुणे, बारामती वार्तापत्र रिपोर्ट
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या अनुषंगाने युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्यपूर्व भागातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी कळविले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे पदसिध्द अध्यक्ष आहेत. राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला असून त्यातील तरतुदीनुसार सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिनांक 5 जानेवारी 2021 पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू केलेले आहेत, असेही डॉ.जयश्री कटारे यांनी कळविले आहे.