औरंगाबादचे नामकरणावर शिवसेना ठाम, शंभूराजे देसाईंचे बारामतीत वक्तव्य
वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडिलांच्या निधनानंतर ते राज्यमंत्री भरणे यांना भेटण्यासाठी आले होते.
औरंगाबादचे नामकरणावर शिवसेना ठाम, शंभूराजे देसाईंचे बारामतीत वक्तव्य
वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडिलांच्या निधनानंतर ते राज्यमंत्री भरणे यांना भेटण्यासाठी आले होते.
बारामती वार्तापत्र
औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा विषय राजकीय चर्चेत असताना शिवसेनेने यापुर्वी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेना ठाम असून त्याच्यात कोणताही बदल झालेला नाही. पक्षाचे मुख्य प्रवक्ते याविषयी प्रसिद्धीमाध्यमांना अधिकृत वृत्त देतील असे सांगितले.
तसेच महा विकास आघाडी ज्या विचारणे एकत्र आली आहे त्या विचाराने कामकाज चालू आहे. महा विकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार कामकाज करत असून कोणतेही मतभेद नाहीत. असे मत राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडिलांच्या निधनानंतर ते राज्यमंत्री भरणे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बारामतीत थांबले होते.
यावेळी त्यांच्यासोबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील ,सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह पुणे जिल्हाध्यक्ष ॲड राजेंद्र काळे, बाळासाहेब शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.