आमदार रोहित पवार पहाटे मार्केटमध्ये दाखल ,,उपमुख्यमंत्री अजित पवारांप्रमाणे कार्यपद्धती
अडचणींविषयी चर्चा केली.
आमदार रोहित पवार पहाटे मार्केटमध्ये दाखल ,,उपमुख्यमंत्री अजित पवारांप्रमाणे कार्यपद्धती
अडचणींविषयी चर्चा केली.
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे भल्या पहाटे आवरून सकाळी सातला मंत्रालयात उपस्थित असतात.
एखाद्या ठिकाणी दौरा करायचा असल्यास अजित दादा पवार आणि त्यांचा ताफा दिवस उगवायच्या आगोदर दौऱ्याच्या ठिकाणी हजर असतात. आणि अधिकाऱ्यांचीही त्रेधातिरपीट उडते.
आजही असेच झाले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भल्यापहाटे आमदार रोहित दादा पवार यांनी बाजार समितीच्या कामकाजाची माहिती घेतली. बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या विक्रीच्या पद्धतीबाबत त्यांनी जाणून घेऊन शेतकऱ्यांबरोबर येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा केली.
शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करत असताना येणाऱ्या अडचणी तसेच व्यापाऱ्यांच्या अडचणी यावर वस्तुस्थितीला धरून येणाऱ्या अडचणी विषयी माहिती घेऊन हे प्रश्न येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मात्र त्यांच्या या पहाटेच्या दौऱ्यावरून अजित दादा पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत रोहित पवारही आपले वर्चस्व समाजमनात कायम ठेवणार याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.