नामदेवराव शिंदे नावाचा ‘माणूस’
थंडीत कुडकुडणाऱ्या माणसाला केली मदत
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे हे आपल्या कडक कामगिरीमुळे सर्वांच्या चर्चेत असतात. मात्र आज त्यांचे एक मृदू व्यक्तिमत्व समोर आले. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांनीही त्यांचा आदर्श घेऊन असे माणुसकीचे दर्शन घडवणारे कार्य करावे.
पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे हे रात्री भिगवण रोड येथे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक व्यक्ती पाऊस व थंडीत कुडकुडत बसल्याचे दिसले.
त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगून त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस केल्यावर सदरच्या व्यक्तीचे नाव सचिन पाडळे रा. नारायणगाव असे असल्याचे त्याने सांगितले. त्या व्यक्तीला रात्रभर पावसात भिजल्यामुळे थंडी ताप आला होता. अंगावर नीटसे कपडे नव्हते, स्वेटर नव्हता
त्याची बिकट अवस्था पाहून नामदेव शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते गणेश शेवाळे यांना याची कल्पना दिली. त्यानंतर शेवाळे यांनी जीएस साम्राज्य चे जितेंद्र धोत्रे ,आकाश कांबळे, निखिल लोणारी , एआर.फाऊंडेशनचे राहुल पवार ,योगेश शेवाळे ,किशोर पवार ,पोलीस बॉईज चे शहराध्यक्ष संजय दराडे ,डीव्हीजी सिक्युरिटी चे संतोष कांबळे या कार्यकर्त्यांना बोलावले
सदरच्या व्यक्तीला दवाखान्यात नेऊन त्याला गोळ्या ,औषधे दिली व अंगात घालण्यासाठी नवीन कपडे, पोटभर जेवायला देऊन त्याला पुढील राहण्याच्या व्यवस्थेसाठी ब्लॅंकेट ,चप्पल ,मास्क दिले व एसटीचे तिकीट काढून त्याच्या गावी पाठवले. या निराश्रित व्यक्तीला नामदेवराव शिंदे यांच्या रूपाने देवच भेटल्याची चर्चा आज बारामती शहरात सुरू होती.