अवैध सावकारीच्या तक्रारी असतील तर पुढे या,,,,पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांचे आवाहन
खाजगी सावकारांनी घेतला धसका
अवैध सावकारीच्या तक्रारी असतील तर पुढे या,,,,पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांचे आवाहन
खाजगी सावकारांनी घेतला धसका
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून बारामतीत अवैध सावकारकिची पाळेमुळे उखडण्याचे काम त्यांनी केले आहे. अशा तक्रारी असतील तर घाबरू नका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.
आपल्या दबंग कामगिरीने जिल्हाभर चर्चेत असलेले बारामती शहर चे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी महाराष्ट्रातील अवैध सावकारी व्यवसायाचा वाढता आलेख ,सावकारकी मुळे वाढत चाललेल्या शेतकरी आत्महत्या ,अवैध सावकार की च्या बेसुमार व्याज वसुलीमुळे पिचुन गेलेला कष्टकरी, श्रमिक वर्ग यांनी पुढे येऊन बारामती शहर पोलीस स्टेशन कडे तक्रार द्यावी. त्यावर तात्काळ योग्य स्वरूपाची कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले.
ज्यांची सावकाराने मानसिक कुचंबना केली आहे. अवाढव्य व्याज वसुली केली आहे. यातील काही लोक स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी समोर येत नाहीत. तसाच अन्याय सहन करत आहेत. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल का? याबाबत त्यांच्या मनात शंका असते. त्यामुळे अवैध सावकारांचे फावले जाते. मात्र ज्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांनी तक्रार करावी. अथवा सुजान नागरिकांनीही अवैध सावकार की मुळे आपल्या आजूबाजूला जर अशाप्रकारच्या अवैध सावकारी च्या घटना घडत असतील तर संबंधित पीडित व्यक्तीला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगावे. कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे असे सांगितले.