BREAKING NEWS : इंदापूर तालुका हादरला;चाकूने सपासप वार करून महिलेचा खून
निमगाव केतकी - सराफवाडी रोडवर घडली घटना
BREAKING NEWS : इंदापूर तालुका हादरला;चाकूने सपासप वार करून महिलेचा खून
निमगाव केतकी – सराफवाडी रोडवर घडली घटना
इंदापूर प्रतिनिधी –
निमगाव केतकी (ता.इंदापूर ) याठिकाणी चाकूने सपासप वार करीत विवाहित महिलेची निर्घृणपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.सुनिता दादाराव शेंडे (वय 33 वर्षे,रा.शेंडेवस्ती,ता.इंदापूर,जि. पुणे ) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचे पती दादाराव निवृत्ती शेंडे (वय 37 वर्षे, रा.शेंडेवस्ती,निमगाव केतकी,ता.इंदापूर जि.पुणे ) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यातील धक्कादायक बाब म्हणजे खुनाची घटना घडल्यानंतर आरोपी स्वतःहून इंदापूर पोलीस ठाण्यात हजर झाला.
याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर (रा.सुरवड ता.इंदापुर जि.पुणे) याच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बुधवारी रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान निमगाव केतकी – सराफवाडी रोडवरील आजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ज्ञानेश्वर रासकर यांनी अज्ञात कारणामुळे सुनिता शेंडे यांच्या डोक्यात पोटात आणि छातीवर चाकूने वार केले.यात सुनिता शेंडे यांचा मृत्यू झाला.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत.