कोरोंना विशेष

ब्रेकिंग न्यूज; राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी,काय आहेत नवीन नियम पहा

रात्री फक्तं अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार.

ब्रेकिंग न्यूज; राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी,काय आहेत नवीन नियम पहा

रात्री फक्तं अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार.

मुंबई, प्रतिनिधी

राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. खरंतर या नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.

राज्य सरकारचे नवे निर्णय नेमके काय-काय?

सरकारी नोकरदारांसाठी नियमावली

  • लेखी आणि स्पष्ट परवानगीशिवाय सरकारी कार्यालयात लोकांना प्रवेश नाही
  • व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन नागरिकांशी संवाद राखणे
  • एकाच कॅम्पसमधील किंवा बाहेरुन आलेल्यांसाठी व्हिडीओ कॉन्फरिन्सिंगद्वारे संवाद
  • कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करुन देणं, तसंच कार्यालयाच्या सोयीनुसार त्यांच्या कामाच्या तासात बदल करणे
  • सरकारी कार्यालयांमध्ये कोरोना नियमांचे तंतोतंत पालन व्हावे
  • थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे
  • खासगी कार्यालये

    1. खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीची मर्यादा
    2. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश, लस घेतले नसलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे
    3. कर्मचाऱ्यांकडून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे याची काळजी घ्यावी
    4. थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे
    5. सर्वसामान्य नागरिकांसाठी नियमावली

>> लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती

>> अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांची उपस्थिती

>> सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती

>> शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. मात्र 10 वी, 12वीचे वर्ग सुरु राहणार. तसंच शाळेतील प्रशासकीय कामे सुरु राहणार.

>> स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून बंद राहणार

>> हेअर कटिंग सलून 50 टक्के उपस्थितीत सुरु राहणार, सलूनमध्ये कोरोना नियमांचे काटेकोर पालन आणि कामगारांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक, रात्री 10 पर्यंतच परवानगी

>> मनोरंजन पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम बंद राहणार

>> शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार

>> चित्रपटगृहे, नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार

>> तारीख जाहीर झालेल्या सर्व परीक्षा होणार

Related Articles

Back to top button