क्राईम रिपोर्ट

बारामतीत युवकावर कोयता, गज व काठ्यांनी जीवघेणा हल्ला; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बारामतीत युवकावर कोयता, गज व काठ्यांनी जीवघेणा हल्ला; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील खंडोबानगर परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ वर्षीय युवकावर कोयता, लोखंडी गज, काठ्या आणि दगडाने हल्ला करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी जखमी युवक नकुल गोपाळ वाल्मीकी यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दुर्गा टॉकीज परिसरात झालेल्या किरकोळ वादात मध्यस्थी करून वाद शांत करण्याचा प्रयत्न नकुल वाल्मीकी यांनी केला होता. मात्र, याच कारणाचा राग मनात धरून काही युवकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार, प्रशांत गोरे, आर्यन गोरे, गौरव गोरे, श्रवण गोरे आणि ऋषीकेश गुळवे यांनी रात्री उशिरा नकुल वाल्मीकी यांना घराबाहेर बोलावले. त्यानंतर आरोपींनी एकत्र येत त्यांच्यावर कोयता, लोखंडी गज, काठ्या तसेच दगडाने बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या हल्ल्यात नकुल वाल्मीकी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भररस्त्यात युवकांवर हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_