क्राईम रिपोर्ट

ChatGPTच्या मदतीने बनावट उत्पन्न दाखला? बारामतीत गुन्हा दाखल; FIRमध्ये गंभीर आरोप

२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ७.२१ वाजता FIR दाखल

ChatGPTच्या मदतीने बनावट उत्पन्न दाखला? बारामतीत गुन्हा दाखल; FIRमध्ये गंभीर आरोप

२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ७.२१ वाजता FIR दाखल

बारामती वार्तापत्र 

शासकीय उत्पन्न प्रमाणपत्रासाठी ChatGPT च्या मदतीने बनावट कागदपत्र तयार करून ते शासकीय प्रक्रियेत सादर केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात अजिज जाफर सय्यद, रा. खंडोबानगर, बारामती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या FIRनुसार, संबंधित व्यक्तीने लेखी जबाबात ChatGPTचा वापर करून उत्पन्नाचा दाखला तयार केल्याचे नमूद केल्याचा दावा आहे. तसेच हा दाखला शासकीय प्रक्रियेत सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 336(2), 336(3), 337, 340(2) आणि 318 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसील कार्यालयातील संबंधित कागदपत्रे, पडताळणी प्रक्रिया, जबाब आणि डिजिटल पुरावे तपासले जाण्याची शक्यता आहे.

२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ७.२१ वाजता FIR क्रमांक ०३६० नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

Back to top button