Covid-19 चे नियम न पाळणार्या बारामतीतील मंगल कार्यालयावर कारवाई!
कोणतीही रितसर परवानगी न घेता लग्नाचे आयोजन केले होते.

Covid-19 चे नियम न पाळणार्या बारामतीतील मंगल कार्यालयावर कारवाई!
कोणतीही रितसर परवानगी न घेता लग्नाचे आयोजन केले होते.
बारामती वार्तापत्र
वडगाव मावळ पो.से:-गु.र.नं.९२/२०२१, महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथ अधिनियम १८९७ सह भा.द.वि.कलम १८८,२१९.२७०, प्रमाणे निरा-बारामती रोड लगत असलेल्या अभिषेक मंगल कार्यालय मौजे सदोबाचीवाडी ता.वारामती, जि.पुणे. या मंगल कार्यालयामध्ये मंगलकार्यालय प्रवेशद्वाराजवळ मंगलकार्यालय व्यवस्थापक/मालक यांनी लग्नसमारंभाचे प्रवेशद्वाराजवळ ऑक्सीमीटर, इन्फ्राथर्मामीटर (थर्मल स्कानंग गन) उपलब्ध न ठेवता लग्नाचे ठिकाणी अंदाजे १०० हुन अधिक नागरीकांनी गर्दी करून कोणतेही सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) न राखता सर्वांनी मास्कचा वापर न केलेने तसेच विनापरवानगी लग्नसमारंभाचे आयोजन करून पार पाडणे संदर्भात कोणतीही रितसर परवानगी न घेता लग्नाचे आयोजन केले होते.
तसेच मा जिल्हाधिकारी सो. यांचे वरील आदेशाचे अवमान करून इतर नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशी कृती करीत असतांना निदर्शनास आलेने फिर्यादी पो.कॉ.ज्ञानेश्वर पांडुरंग सानम यांनी आरोपी नामे.
१) वधु पिता श्री.निसारभाई शमसुददीन पठाण रा.चोपडज, ता.बारामती, जि.पुणे. तसेच मंगल कार्यालय मालक
२) विवक कोष्टीराम भोसले, रा.कुरणेवाष्टी,ता.बारामती.जि.पुणे. आरोपी यांचे विरूष्ट वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.