महाराष्ट्र

Credit-Debit कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 सप्टेंबरपासून RBI बदलणार हे नियम

जर तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर हे बदल तुम्ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Credit-Debit कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 सप्टेंबरपासून RBI बदलणार हे नियम.

जर तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर हे बदल तुम्ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

बारामती वार्तापत्र

कोव्हिड 19 च्या संक्रमणामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आरबीआय हे बदल 30 सप्टेंबरपासून लागू करत आहे, अन्यथा हे बदल जानेवारी महिन्यात लागू केले जाणार होते.

जाणून घ्या काय आहेत हे बदल

आंतरराष्ट्रीय व्यवहार, ऑनलाइन व्यवहार आणि कॉन्टक्टलेस कार्ड व्यवहारासाठी ग्राहकांना अर्ज करावा लागेल. जर आवश्यकता असल्यास तरच या सेवा मिळतील आणि त्याकरता अर्ज करावा लागेल.

आरबीआयने बँकांना असे म्हटले आहे की, डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करताना आता ग्राहकांना देशांतर्गत ट्रान्झॅक्शनची परवानगी द्यायला हवी. अर्थात जर आवश्यकता नाही आहे तर एटीएम मशीनमधून पैसे काढताना आणि पीओएस टर्मिनलवर शॉपिंगसाठी परदेशी ट्रान्झॅक्शनसाठी परवानगी देऊ नये.

सध्याच्या कार्ड्ससाठी- कार्ड जारी करणारे त्यांच्या जोखिमेच्या आधारावर निर्णय घेऊ शकतात. अर्थात तुम्हाला तुमच्या कार्डवरून देशांतर्गत ट्रान्झॅक्शन करायचे आहे की आंतरराष्ट्रीय याचा निर्णय ग्राहक करू शकतात. तसंच कोणती सर्व्हिस सक्रीय ठेवायची आहे आणि कोणती डिअॅक्टिव्हेट करायची आहे याचा निर्णय देखील घेऊ शकतात.

ग्राहक त्याच्या एटीएमल ट्रान्झॅक्शनची मर्यादा कधीही बदलू शकतो. म्हणजेच तुम्ही तुमच्या मोबाइल अॅपवरून, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून, एटीएम मशीनच्या ठिकाणी जाऊन, आयव्हीआरच्या माध्यमातून एटीएम कार्ड ट्रान्झॅक्शन मर्यादा निश्चित करू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!