अनेकान्त एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता प्रवेशित विद्यार्ध्यांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा
६० वर्षांपासूनचा संस्थेचा इतिहास सांगून विद्यार्थ्यांचे स्वागत
बारामती वार्तापत्र
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जवाहर शहा (वाघोलीकर) व सचिव मा.श्री.मिलिंद शाह (वाघोलीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकान्त एज्युकेशन सोसायटीमध्ये नव्याने फार्मसी महाविद्यालयाची सुरुवात यावर्षी करण्यात आली.
महाविद्यालयामध्ये दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.विकास शहा (लेंगरेकर) सदस्य, अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, बारामती यांनी विद्यार्थ्यांना गेल्या ६० वर्षांपासूनचा संस्थेचा इतिहास सांगून विद्यार्थ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी मा.श्री. सोहम राहुल शहा (वाघोलीकर) उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. डॉ. अविनाश जगताप प्राचार्य, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती व मा.श्री अभिनंदन शहा प्रबंधक, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभागांची व त्यांना असणाऱ्या नॅक मानाकंनाही माहिती देऊन महाविद्यालय परिसरातील शिस्त पालनाबाबत आवाहन करून शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. दर्शन शहा यांनी फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमातील विविध संधी बाबत माहिती देऊन त्या संधी पर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने वाटचाल करावी यासाठीचे मार्गदर्शन केले.