NDA ची ऑफर देणाऱ्या आठवलेंना शरद पवारांनी फटकारले, पाहा हा VIDEO
'रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री आहे. पण त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही.
NDA ची ऑफर देणाऱ्या आठवलेंना शरद पवारांनी फटकारले, पाहा हा VIDEO
‘रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री आहे. पण त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही.
पंढरपूर, बारामती वार्तापत्र
रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये सामील होण्याचे आवाहन केले होते. पण, आज शरद पवार यांनी ‘तुमच्या एकतरी आमदार आहे का?’ असा सवाल करत सणसणीत टोला लगावला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि हभप रामदास महाराज कैकाडी (जाधव) या तीन दिग्गज व्यक्तींचे कोरोनामुळे निधन झाल्याने पवार हे या तिन्ही सहकाऱ्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी रामदास आठवले यांनी एनडीएत येण्याच्या ऑफर शरद पवारांनी खुमसाद उत्तर दिले.
‘रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री आहे. पण त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही. राज्यसभेत ही आणि बाहेर सुद्धा त्यांनी कुणी ही गांभीर्याने घेत नाही. त्यांचा पक्षाचा एक सुद्धा आमदार नाही आणि खासदार सुद्धा नाही. ते नुसते बोलत असता, मार्गदर्शन करत असता’, असं म्हणत शरद पवारांनी आठवले यांना चांगलाच टोला लगावला आहे.