शैक्षणिक

UPSC 2021 ची प्रिलिमनिरी परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय

ही परीक्षा 27 मे 2021 रोजी होणार होती. मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

UPSC 2021 ची प्रिलिमनिरी परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय

ही परीक्षा 27 मे 2021 रोजी होणार होती. मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

मुंबई : बारामती वार्तापत्र रिपोर्ट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. त्यामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता UPSC 2021ची प्रिलिमनिरी परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही परीक्षा 27 जून 2021 रोजी होणार होती. मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय

महापोर्टलच्या परीक्षा घेण्यास MPSC तयार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पदांसाठी परीक्षांचं आयोजन करण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र, लोकसेवा आयोगानं राज्य सरकारपुढे या संदर्भात काही मुद्दे मांडले आहेत. महापोर्टल म्हणजेच महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या गट ब आणि गट क, ड च्या परीक्षा एमपीएससीतर्फे घेण्यात याव्यात, अशी मागणी हजारो विद्यार्थी करत होते. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं लोकसेवा आयोगाकडे याबाबत पत्राद्वारे विचारणा केली होती. त्यानुसार लोकसेवा आयोगानं राज्य सरकारला पत्राद्वारे त्यांची भूमिका कळवली आहे.

राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पदांसाठी परीक्षांचं आयोजन करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं तयारी दर्शवली आहे. याबाबत लोकसेवा आयोगानं राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार केला आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या गट ब आणि गट क मधील पदासांठीच्या परीक्षा घेण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं याबाबत राज्य सरकारला पत्राद्वारे त्यांची भूमिका कळवली आहे. गट ब आणि गट कच्या परीक्षा घेण्यासाठी काय करावे लागेल, याविषयी देखील आयोगानं राज्य सरकारला कळवलं आहे.

एमपीएससीमार्फत परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना लाभ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरती परीक्षा घेतल्यास त्यामध्ये पारदर्शकता राहणार आहे. विद्यार्थ्यांनी याविषयी राज्य सरकारकडे मागणी केली होती. लोकसेवा आयोगानं परीक्षा घेतल्यास सगळ्याच भरतीप्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. आता शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram