Visa शिवाय जगातील या 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, राज्यसभेत सरकारनं दिली माहिती, जाणून घ्या.
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी याबाबत सभागृहात माहिती दिली आहे.
Visa शिवाय जगातील या 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, राज्यसभेत सरकारनं दिली माहिती, जाणून घ्या
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी याबाबत सभागृहात माहिती दिली आहे.
बारामती वार्तापत्र
जगात असे १६ देश आहेत जेथे पासपोर्टधारक भारतीयांना प्रवास करण्यासाठी व्हिसा लागत नाही. या देशांमध्ये नेपाळ, मालदीव, भूतान आणि मॉरिशस सारख्या देशांचा समावेश आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी याबाबत सभागृहात माहिती दिली आहे.
नवी दिल्ली राज्यसभेला लेखी उत्तर देताना मुरलीधरन म्हणाले की,४३ देश व्हिसा-ऑन-अराइवल सुविधा प्रदान करतात आणि ३६ देशांमध्ये भारतीय सामान्य पासपोर्ट धारकांना ई-व्हिसा सुविधा उपलब्ध करतात .
या देशांना आवश्यक नाही व्हिसा – ज्या देशांना प्रवासासाठी व्हिसा लागत नाही असे देश आहेत – बारबाडोस, भूतान, डोमिनिका, ग्रेनाडा, हैती, हाँगकाँग SAR, मालदीव, मॉरिशस, मोंटसेराट, नेपाळ, नीयू द्वीप, समोआ, सेनेगल , त्रिनिदाद आणि टोबैगो, सेंट विंसेंट आणि ग्रेनेडाइंस आणि सर्बिया.
केंद्र सरकारने पुरविलेल्या माहितीनुसार, व्हिसा-ऑन-अराइवल सुविधा देणार्या देशांमध्ये इराण, इंडोनेशिया आणि म्यानमार यांचा समावेश आहे आणि श्रीलंका, न्यूझीलंड आणि मलेशिया या २६ देशांच्या गटात ई-व्हिसा सुविधा आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ व्हावे या उद्देशाने भारतीय नागरिकांना व्हिसा रहित प्रवास, व्हिसा-ऑन-अराइवल आणि ई-व्हिसा सुविधा देणार्या देशांची संख्या वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मंत्री म्हणाले.