आघाडी सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक हेमंत पाटील
महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचे सरकार आहे आणि हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेन

आघाडी सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक हेमंत पाटील
महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचे सरकार आहे आणि हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेन
बारामती वार्तापत्र
आघाडी सरकार सकारात्मक आहे लवकरच यावर तोडगा निघेल असे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील बारामती मध्ये बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले भाजप पक्षाचे नेते मंडळी समाजामध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. ते सत्तेवर असताना फक्त भ्रष्टाचार करण्याचे काम पाच वर्षे केले आणि मराठा व ओबीसी समाजाबरोबरच धनगर समाजाच्या आरक्षणचा प्रश्न तसाच झुलवत ठेवला आहे. आता मात्र आघाडी सरकारच्या विरोधात बोंब मारण्याचे काम चालू केले आहे. जेष्ठ नेते शरद पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची काही नेते मंडळी टीका टिपणी करून प्रसिद्धी मिळवत आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे की, पवार घराण्याने सर्व जातीधर्मातील लोकांसाठी काय काय विकास केला आहे. महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचे सरकार आहे आणि हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेन. मा. जेष्ठ नेते शरद पवार साहेब, मा. सोनियाजी गांधी, व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले आहे असे हेमंत पाटील म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा उपध्यक्ष साधू बल्लाळ, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजीराव पाथरकर उपस्थित होते.