मुंबई
ईडी कोठडीत असलेल्या नवाब मालिकांची प्रकृती बिघडली;उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल
पोटदुखीचा त्रास सुरू

ईडी कोठडीत असलेल्या नवाब मालिकांची प्रकृती बिघडली;उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल
पोटदुखीचा त्रास सुरू
मुंबई प्रतिनिधी
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली आहे. त्यांच्या अटकेनं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालेली पहायला मिळाली. अशातच आता ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांची प्रकृती ढासळल्याचं समोर आलं आहे.
नवाब मलिक यांना सात दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्यात आलं आहे. अशातच नवाब मलिकांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे सध्या त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच रिमांडला विरोध करण्यासाठी नवाब मलिक यांनी अर्ज दाखल केला होता. स्टेज II च्या क्रॉनिक किडनी रोगामुळे त्याला पाय दुखणे आणि सूज येण्याची तक्रार आहे. तुरुंगात त्याला वेदनाशामक औषध देण्यात आले आहे, जे या रोगासाठी चांगले नाही. सर जेजे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना औषध दिलेले नाही. आरोपीच्या तक्रारीच्या अनुषंगाने, मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांना आरोपीच्या आजाराचा क्रमिक अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले होते.