इंदापूरातील इंद्रेश्वर यात्रेला आजपासून प्रारंभ
गुरुवारी (दि.27) महाप्रसादाने या इंद्रेश्वर यात्रेची सांगता होणार आहे.

इंदापूरातील इंद्रेश्वर यात्रेला आजपासून प्रारंभ
गुरुवारी (दि.27) महाप्रसादाने या इंद्रेश्वर यात्रेची सांगता होणार आहे.
इंदापूर; प्रतिनिधी
इंदापूरातील ग्रामदैवत इंद्रेश्वराच्या यात्रेस शुक्रवारपासून (दि.21) प्रारंभ होत आहे. महाशिवरात्रिपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य रथयात्रा ही 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर देवस्थान ट्रस्ट व श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने देण्यात आली.
सात दिवस होणाऱ्या या यात्रा उत्सवाच्या कालावधीत शुक्रवारी (दि.21) श्री गणेश पूजन यामध्ये श्री गणेश शिव पंचायतन पूजन, श्री इंद्रेश्वर महादेव रुद्राभिषेक, लताताई देशपांडे यांचे श्री शिवलीलामृत पारायण, शनिवारी (दि.22) पारायण, रविवारी (दि.23)बाल संस्कार वर्ग, सोमवारी (दि.24) ध्वज पूजन व जलाभिषेक व सायंकाळी सहा वाजता अमर ओके व सहकारी यांचा भावगीत, बुधवारी (दि.26) महाशिवरात्री दिवशी पहाटे श्री इंद्रेश्वर महादेव रुद्राभिषेक व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तर गुरुवारी (दि.27) महाप्रसादाने या इंद्रेश्वर यात्रेची सांगता होणार आहे.