इंदापूरातील पॉलिटेक्निक कॉलेजला आयएसओ
जागतिक मानांकन मिळवून यशाचे शिखर गाठले

इंदापूरातील पॉलिटेक्निक कॉलेजला आयएसओ
जागतिक मानांकन मिळवून यशाचे शिखर गाठले
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूरातील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज आता आयएसओ २१००१:२०१८ प्रमाणित संस्था झाली आहे. जागतिक मानांकन मिळवून यशाचे शिखर गाठले आहे.साउथ एशिया प्रा. लि. द्वारे प्रदान केलेले हे प्रमाणपत्र शैक्षणिक व्यवस्थापनात उच्च दर्जा राखण्यासाठी आणि शैक्षणिक संस्था व्यवस्थापन प्रणालींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्थेच्या वचनबद्धतेची दखल घेते. प्रमाणपत्र प्रदान समारंभ बारामती येथे आयोजित केला होता.
यावेळी संस्थेच्या विश्वस्त खासदार सुनेत्रा अजित पवार, उपाध्यक्ष अशोक वासुदेव प्रभुणे, सचिव अॅड. नीलिमा विनोदकुमार गुजर, रजिस्ट्रार कर्नल (निवृत्त) श्रीश कंबोज, प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे उपस्थित होते.
संस्थेच्या विश्वस्त खासदार सुनेत्रा पवार यांनी शैक्षणिक पद्धतींमध्ये सतत सुधारणा करण्याचेमहत्त्व अधोरेखित केले. एक उच्च बेंचमार्क स्थापित केल्याबद्दल महाविद्यालयाचे, तसेच प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे, प्राध्यापक वृंद यांचे कौतुक केले. संस्थेचे उपाध्यक्ष अशोक वासुदेव प्रभुणे यांनी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि शैक्षणिक संस्था व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यासाठी, केलेल्या प्रयत्नांसाठी महाविद्यालयाचे कौतुक केले.