इंदापूरात मकर संक्रांत उत्साहात; महिलांची मंदिरात गर्दी
शहरातील विविध भागातील मंदिरात दर्शनासाठी रांगा..

इंदापूरात मकर संक्रांत उत्साहात; महिलांची मंदिरात गर्दी
शहरातील विविध भागातील मंदिरात दर्शनासाठी रांगा..
इंदापूर प्रतिनिधी –
मकर संक्रांतीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. एकमेकांना तिळगूळ देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून शुभेच्छा दिल्या.शहरातील विविध भागातील मंदिरात दर्शनासाठी रांगा होत्या.
नवीन वर्षातील पहिला सण असलेला मकर संक्रांत शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरात दर्शनासाठी महिलांची रांगा होत्या. महिला वर्ग एकमेकींना हळदी-कुंकू लावून वाणाची देवाण-घेवाण करत शुभेच्छा देत होत्या. बाजारातही तिळगुळाबरोबर वाणाचे साहित्याची विक्री जोरदार झाली. बोर-तिळाचे लाडू, सुगडे पूजन एकमेकींना वाण देऊन मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला. तसेच मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या वाण, वस्तुंचे स्टॉल्स मुख्यबाजारपेठेसह इतर ठिकाणी देखील भागात लावण्यात आले होते. हळदी-कुंकुसह विविध वाण खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत गर्दी होती.