इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत कारवाईत ६ लाख ५५ हजार रूपये किंमतीचा गांजा जप्त.
पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात.
इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत कारवाईत ६ लाख ५५ हजार रूपये किंमतीचा गांजा जप्त.
पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात.
इंदापूर:-प्रतिनिधी
इंदापुर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक २१ जुलै रोजी पहाटे ०४.२५वा सुमारास इंदापुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सारंगकर, स.पो.नि लोकरे,हे स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना याच परिसरात दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण पथकाचे सहाय्यक फौजदार मोहिते, सहाय्यक फौजदार खरात हे त्यांचे स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना त्यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इंदापुर सोलापुर हायवे रोडने दुचाकी वर दोन इसम हे गांजाची चोरून रात्री तस्करी करीत पुणे बाजुकडुन सोलापुर बाजुकडे जाणार आहेत अशी बातमी मिळताच त्यांनी त्याबाबत इंदापुर पोलीस स्टेशनशी संपर्क करून इंदापुर पोलीसांनी सदर बाबत नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांना वरील बातमीचा आशय सांगताच नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांनी सदर कार्यवाही साठी आम्ही स्वतः येतो असे सांगून ते आलेनंतर सदर बाबत डोंगराई सर्कल इंदापुर येथे नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचून पोलीस थांबले असता दोन इसम संशयीत रित्या मध्ये काहीतरी संशयीत माल घेवून येताना पोलीसांना दिसल्या नंतर पोलीसांनी त्यांना जागीच पकडून त्यांची नाव पत्ते विचारले असता त्यांनी आपले नाव फिरोज हबीब शेख वय ४० रा. विसापुर ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर व विशाल रंगनाथ आढाव वय २२ रा.रेवती पाढळी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर असे सांगीतले नंतर पोलीसांनी त्यांचेकडील मालाची पाहणी केली असता त्यांचेकडे ३२ किलो गांजा कि . रू.६ लाख ५५ हजार रूपये किंमतीचा गांजा मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आलेली असून त्याबाबत सहाय्यक फौजदार अर्जुन हरिबा मोहिते दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण यांनी फिर्याद दाखल केलेली आहे .
सदर गुन्हयाचा पुढील तपास संदिप पाटील पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण,मिलिंद मोहिते अपर पोलीस अधीक्षक बारामती, नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकरे इंदापुर पोलीस स्टेशन हे अधिक तपास करीत आहेत.