संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली,वैभवी देशमुख धनंजय देशमुख ही होणार सहभागी!
मोर्चामध्ये मराठा समाजा बरोबरच इतर सर्व धर्मीय बांधवांनी सुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बारामती वार्तापत्र
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी 9 मार्च रोजी बारामतीमध्ये सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वी हा मोर्चा 8 मार्चला काढण्यात येणार होता. मात्र यात बदल करण्यात आलेला असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अमरसिंह जगताप यांनी दिली आहे.
संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आलेली होती. या घटनेला 3 महीने पूर्ण होत आहेत. अशी घटना पुनः होऊ नये आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. बारामतीमध्ये होणाऱ्या या सर्वधर्मीय मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख हे देखील सहभागी होणार आहेत.
असा आहे मोर्चाचा मार्ग
बारामती कसबा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून हा निषेध मोर्चा भिगवन चौकापर्यंत काढला जाणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कळविण्यात आली आहे. या निषेध मोर्चामध्ये मराठा समाजा बरोबरच इतर सर्व धर्मीय बांधवांनी सुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती संघटनाच्या वतीने करण्यात आले आहे.