उजनीच्या पाणीसाठ्यात 2 टीएमसीने वाढ

उजनी धरणामध्ये एकूण 53 पूर्णांक 25 टीएमसी इतका पाणीसाठा

उजनीच्या पाणीसाठ्यात 2 टीएमसीने वाढ

उजनी धरणामध्ये एकूण 53 पूर्णांक 25 टीएमसी इतका पाणीसाठा

इंदापूर प्रतिनिधी –

मागील चार दिवसांपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील जिल्ह्याच्या विविध भागांसह इंदापूर तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत 2 टीएमसीहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात खालावणारी उजनी धरणाची पाणीपातळी यंदा स्थिर राहील अशी शक्यता दिसत आहे.

पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर साठी जीवनदायीने ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मागील तीन चार दिवस सतत पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाढ झाली आहे. गेल्या तीन चार दिवसात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची कधी मुसळधार तर कधी संततधार स्थिती राहिलेली आहे आणि यामुळे गेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये 2 टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला आहे.

सध्या उजनी धरणामध्ये एकूण 53 पूर्णांक 25 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. उजनी धरण हे आजच्या स्थितीला मायनस 19 पूर्णांक 43 टक्के इतका आहे. मायनस मध्ये असलेले उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी आणखी 10 पूर्णांक 41 टीएमसी इतकी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे. अजून हे पाणी धरण साठवण क्षमतेत जमा झालेले नाही. सद्यःस्थितीला उजनी धरणात येणारा विसर्ग हा शून्य आहे. तरीही पाणी साठ्यात 2 टीएमसीने वाढ झालेली आहे. दरम्यान, 6 जूनला महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

उजनीची 24 मे 2025 ची पाण्याची स्थिती

एकूण पाणी पातळी 489.20 मी

एकूण पाणीसाठा 1507.99 घन मीटर (53.25 टीएमसी)

उपयुक्त जलसाठा 294.82) घन मीटर (- 10.41टीएमसी)

टक्केवारी 19.43 टक्के

Related Articles

Back to top button