स्थानिक

रयत मध्ये 33 वर्ष मुख्याध्यापक पदावर काम केलेले श्री भगवान भिसे यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न

600 रुपये महिना या पगारावर लमसम शिक्षक म्हणून सरांची नोकरी सुरू झाली

रयत मध्ये 33 वर्ष मुख्याध्यापक पदावर काम केलेले श्री भगवान भिसे यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न

600 रुपये महिना या पगारावर लमसम शिक्षक म्हणून सरांची नोकरी सुरू झाली

बारामती वार्तापत्र 

रयत शिक्षण संस्थेच्या बारामती येथील राधेश्याम एन अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज बारामतीचे प्राचार्य श्री भगवान रावबा भिसे यांचा सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला. 26 जुलै 1993 रोजी कालिकामाता विद्यालय वाघाळे ता. शिरूर या ठिकाणी 600 रुपये महिना या पगारावर लमसम शिक्षक म्हणून सरांची नोकरी सुरू झाली.

रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला लागल्यापासूनच श्री भिसे हे मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. गेल्या 33 वर्षांमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या 18 शाळांचे ते मुख्याध्यापक म्हणून काम केलेले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग, पश्चिम विभाग, मध्य विभाग तसेच रायगड विभाग अशा चारही विभागात मुख्याध्यापक पदावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

त्यांची काम करत असताना विद्यार्थ्यांप्रती असणारी निष्ठा आणि दूरदृष्टी, त्याच पद्धतीने रयत शिक्षण संस्थेविषयी असणारी आपुलकी यामुळे रयत शिक्षण संस्थेत त्यांचा मोठा नावलौकिक आहे. त्यांनी रयतच्या अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

त्याच पद्धतीने 22 मार्च 2025 रोजी टेक्निकल विद्यालयात त्यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सर्व वर्गांमध्ये इंटर ऍक्टिव्ह बोर्ड तसेच 30 संगणक व सर्व वर्गांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम केले. शासनाच्या नियत वयोमानानुसार 31 मे 2026 रोजी सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.

त्या निमित्ताने आयोजित केलेल्या या समारंभाचे अध्यक्ष जनरल बॉडी सदस्य श्री सदाशिव (बापूजी) सातव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाहू हायस्कूलचे प्राचार्य श्री गणपतराव तावरे उपस्थित होते.

तसेच परिसरातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक ,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सतीश पाचपुते यांनी केले तर सूत्रसंचालन श्री जगताप सर यांनी केले.

Back to top button