उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामतीत विकास कामांची पाहणी
विकास कामे चांगल्या दर्जाची आणि वेळेत पूर्ण करावीत, आशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामतीत विकास कामांची पाहणी
विकास कामे चांगल्या दर्जाची आणि वेळेत पूर्ण करावीत, आशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बारामती वार्तापत्र
बारामती परिसरात सुरु असणाऱ्या विविध विकासकामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पाहणी केली. पंचायत समिती, नगर परिषद, तालीम संघाची इमारत, जुनी कचेरी, कऱ्हा नदीवरील पूल, शिवाजी उद्यान, पाण्याची टाकी परिसर आणि पाटस रोड येथील कालव्याशेजारील पुलाच्या जागेची पाहणी केली. कामे करताना नागरिकांच्या सुविधा आणि कामाचा दर्जा याबाबतीत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, सा. बा. विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.