कोरोंना विशेष
कोरोना प्रतिबंधक जनगागृती बाबत एलईडी मोबाईल व्हॅन चित्ररथाची उपमुख्यमंत्री यांनी केली पाहणी
चित्ररथाद्वारे बारामती तालुक्यात सध्या प्रसिध्दी करण्यात येत आहे

कोरोना प्रतिबंधक जनगागृती बाबत एलईडी मोबाईल व्हॅन चित्ररथाची उपमुख्यमंत्री यांनी केली पाहणी
चित्ररथाद्वारे बारामती तालुक्यात सध्या प्रसिध्दी करण्यात येत आहे
बारामती वार्तापत्र
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठकी’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच जैवविविधता पूरक गाव संकल्पनेबाबत आणि कोरोना प्रतिबंधक जनगागृती बाबत एलईडी मोबाईल व्हॅन (फिरता चित्ररथ) तयार केले आहेत. सदर चित्ररथाद्वारे बारामती तालुक्यात सध्या प्रसिध्दी करण्यात येत आहे, त्याची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी डॉ. मनिष गायकवाड यांनी चित्ररथाच्या कार्यक्रमांची माहिती दिली.