गोपाळकाल्याच्या निमित्ताने शिवशंभो प्रतिष्ठानने राबवली वेशभूषा स्पर्धा
स्पर्धेत अनेकांनी घेतला सहभाग

गोपाळकाल्याच्या निमित्ताने शिवशंभो प्रतिष्ठानने राबवली वेशभूषा स्पर्धा
स्पर्धेत अनेकांनी घेतला सहभाग
इंदापूर : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही दहीहंडी उत्सवाला राज्य सरकारने परवानगी नाकारली.त्यामुळे इंदापूर येथील शिवशंभो दहीहंडी संघाचे अध्यक्ष शुभम पवार यांच्या पुढाकारातून दहा वर्षांखालील बाळगोपाळांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करून गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला.या स्पर्धेत पन्नास बाल स्पर्धकांनी विविध वेशभूषा करून सहभाग नोंदवला होता.
वेशभूषा स्पर्धेस इंदापूर शहरासह परिसरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्लोक भांडे, द्वितीय क्रमांक युगांक देवकर, तृतीय क्रमांक वंश गुंडेकर, चतुर्थ क्रमांक राजनंदिनी घोगरे व पाचवा क्रमांक विहान जाधव याचा आला. सदरील स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ इंदापूर येथील शंभू महादेव मंदिर या ठिकाणी प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी ( दि.३ ) पार पडला.
यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेरमन भरत शहा,मा.उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे,हरिदास सामसे, ॲड.असिफ बागवान,गणपत पवार,शकिल मोमीन,रमेश पवार,जाकिर मोमीन,सोमनाथ गवळी,गोरख पवार,भाऊसाहेब पवार, ॲड.पंकज सूर्यवंशी, संतोष जाधव,लोकसेवा युथ फाऊंडेशन संस्थापक-अध्यक्ष गौरव राऊत हे उपस्थित होते. शिवशंभो दहिहंडी संघाचे सदस्य राहुल खोमणे, रुपेश पवार,रोहन गाढवे,आकाश गावडे,ऋतुराज जाधव,मोहिन मोमीन,साहिल मोमीन,अंबादास ढावरे,ऋषि मोहिते,योगेश पवार,सैफ बिराजदार,शिवतेज दडस,आकाश ताटे,रियाज शेख उपस्थित होते.सुत्रसंचालन सागर पवार यांनी केले व आभार हरिदास सामसे सर यांनी मानले.