ग्राहकांच्या वीज बिल माफी संदर्भात वीज बिलांची होळी करत भाजपचे इंदापूर महावितरण कार्यालया समोर आंदोलन
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी
ग्राहकांच्या वीज बिल माफी संदर्भात वीज बिलांची होळी करत भाजपचे इंदापूर महावितरण कार्यालया समोर आंदोलन
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज दि.१९ रोजी ग्राहकांच्या वीज बिल माफी संदर्भात वीज बिलांची होळी करत इंदापूर महावितरण कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.यावेळी महाविकास आघाडीचा निषेध असो,कोण म्हणतं देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही अशा प्रकारे विविध घोषणाबाजी करत महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री व राज्य सरकारचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात वीज बिल ग्राहकांचे बिल माफ करू,ग्राहकांच्या वीज बिल युनिट मध्ये सवलत देऊ, वाढीव बिले देणार नाही, जळालेले विद्युत रोहित्र हे ताबडतोब बसून देऊ अशा घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्र्यांनी त्यावेळी केल्या होत्या, परंतु काल अचानकपणे राज्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नाही असे सांगितले. त्यांना या परिस्थितीचा अंदाज नव्हता का?असा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारने शेतकरी व ग्राहकांची फसवणूक केली असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी यावेळी केला. तसेच कोविड काळात महाराष्ट्रात सर्व आर्थिक व्यवहार ठप्प असल्याकारणाने सरकारने महाराष्ट्रातील सर्वांची होणारी सक्तीची वीजबील वसूली थांबावावी, वीजबील माफ करावे अशी मागणी करत याबाबतचे निवेदन महावितरणचे अभियंता गोफणे यांच्याकडे देऊन वीज बिल माफ न झाल्यास शेतकरी व वीज ग्राहक यांना एकत्र करून भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=173771021124189&id=100054738754083&sfnsn=wiwspwa
या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार,भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद, निरा भिमा कारखान्याचे चेरमन लालासाहेब पवार, व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे,विलासराव वाघमोडे,उदयसिंह पाटील,मंगेश पाटील, मयूरसिंह पाटील,अँड.कृष्णाजी यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले,भरत शहा,नगरसेवक कैलास कदम,दत्तात्रेय शिर्के, प्रताप पाटील,मोहन गुळवे, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील , ललेंद्र शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.