चार सावकारा विरोधात जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल
बारामती शहर पोलीस कारवाई आणखी तीव्र करणार
चार सावकारा विरोधात जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल
बारामती शहर पोलीस कारवाई आणखी तीव्र करणार
बारामती वार्तापत्र
बारामतीत खाजगी सावकारांच्या विरोधात पाच लाख रुपयांच्या बदल्यात व्याजासह पंधरा लाख रुपये दिल्यानंतरही बेकायदेशीररित्या लिहून घेतलेली दोन एकर जमीन परत न देणाऱ्या खाजगी सावकारवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील दोन महिन्यापासून बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी अवैध सावकारी करणाऱ्याना चांगलाच धडा शिकवला आहे.मात्र अजूनही काही बिळातील सावकार हळू हळू बाहेर येत असल्याचे चित्र दिसत आहे.
भास्कर काशिनाथ वनवे, दत्तात्रय राजाराम वनवे दोघे राहणार लाकडी तालुका इंदापूर, महादेव उर्फ बिट्टू जालिंदर सांगळे रा. जळोची, बारामती या सावकारांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापू श्रीरंग वनवे राहणार लाकडी यांनी याबाबत फिर्याद दिली असून सन 2015 पासून व्याजाच्या पैशांवरून हा प्रकार सुरू आहे. 2015 मध्ये बापू वनवे यांच्या मुलीच्या लग्नासाठी बिट्टू सांगळे यांच्याकडून पाच लाख रुपये लग्नासाठी घेतले. त्याबदल्यात बापू वनवे यांच्याकडून आरोपी सावकार महादेव सांगळे यांनी तीन कोरे चेक घेतले ,ऑगस्ट 2015 पर्यंत व्याजापोटी 90 हजार रुपये सावकाराला दिले. परंतु त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव 17 ऑगस्ट 2015 रोजी लाकडी येथील बापू वनवे यांची एक एकर जमीन खुश खरेदी म्हणून लिहून घेतली व पुन्हा काही कालावधीनंतर आणखी एक एकर जमीन लिहून घेण्यात आली.
2019 मध्ये भास्कर वनवे यांनी फिर्यादीच्या दुचाकीचे आरसी बुक घेतले, पाच लाखाच्या बदल्यात दहा लाखांच्या व्याजासह आजपर्यंत 15 लाख रुपये दिले असतानाही जमीन पटवून देत नाही व 22 ऑक्टोबर 2020 रोजी ही जमीन आरोपींनी विकली त्यानंतर या जमिनीचा ताबा संबंधिताला द्यावा यासाठी 30 ऑक्टोबर 20 रोजी आरोपींनी फिर्यादीच्या फिर्यादीच्या घरी येत शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत बापू वनवे यांनी म्हटले आहे.
ज्या नागरिकांवर खाजगी सावकारांनी अन्याय केला असेल त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.