जैन तत्त्वज्ञानानुसार जगातील पहिल्या ४०५ फूट सुमेरू पर्वताचे पंच कल्याणक महोत्सव लोकार्पण ; श्री धर्मसेन भट्टाचार्य महास्वामी वरुर यांची इंदापूर येथे माहिती
जगातील पहिल्या सुमेरू पर्वताचे लोकार्पण

जैन तत्त्वज्ञानानुसार जगातील पहिल्या ४०५ फूट सुमेरू पर्वताचे पंच कल्याणक महोत्सव लोकार्पण ; श्री धर्मसेन भट्टाचार्य महास्वामी वरुर यांची इंदापूर येथे माहिती
जगातील पहिल्या सुमेरू पर्वताचे लोकार्पण
इंदापूर प्रतिनिधी –
श्री दिगंबर जैन नवग्रह तीर्थक्षेत्र वरुर ( ता. हुबळी जि. धारवाड, कर्नाटक ) येथील एस. डी. ट्रस्ट च्या वतीने वरुर येथे दिनांक १५ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत पंच कल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त जैन तत्वज्ञानावर आधारित ४०५ फूट उंचीच्या ट्रस्ट निर्मित जगातील पहिल्या सुमेरू पर्वताचे लोकार्पण, जैन धर्माचे तेवीसावे तीर्थंकर श्री पार्श्वनाथ भगवान यांच्या ६१ फूट उंचीच्या
खडगासन अवस्थेतील मूर्तीचा १२ वर्षानंतर महामस्तकाभिषेक तसेच ४०५ फूट उंचीच्या भारतीय तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. गणाधिपती गणाधराचार्य श्री १०८ कुंथूसागर महाराज, त्यांचे आज्ञानुवर्ती शिष्य राष्ट्रसंत श्री १०८ आचार्य श्री गुणधरनंदी महाराज यांच्या आशीर्वादाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वरुर तिर्थक्षेत्राचे भट्टारक श्री धर्मसेन भट्टाचार्य महास्वामी यांनी इंदापूर येथे दिली.
यावेळी श्रीमती नीला शरद शहा, दिगंबर जैन हुमड संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, अहिंसा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संगीता शहा, भारतीय जैन संघटनेचे इंदापूर शहराध्यक्ष धरमचंद लोढा यांनी धर्मसेन भट्टाचार्य महास्वामी यांचे पाद प्रक्षालन करून त्यांचे स्वागत केले. यावेळी धर्मसेन भट्टाचार्य महास्वामी यांनी शिरीन दोशी, मिलींद दोशी, सागर दोशी, अरुण दोशी यांच्या घरी भेट देवून जैन धर्माची प्रभावना करत त्यांना या कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी महा स्वामीजी, यश गांधी, आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा, संचालिका डॉ. राधिका शहा, डॉ. सुश्मिता शहा यांच्या हस्ते पोस्टर प्रकाशन करण्यात आले.
श्री धर्मसेन भट्टाचार्य महास्वामी पुढे म्हणाले, या कार्यक्रमास १८ आचार्य व चतुर्विध संघाचे २०० हून जास्त दिगंबर मुनी राज, आर्यिका उपस्थित राहणार असून यंदा प्रथमच लेजर शो व्दारे महामस्ताकाभिषेक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. यानिमित्त सर्व धर्माच्या ४०५ साधू, संत महंत यांचे सर्वधर्म संमेलन आयोजित करण्यात आले असून १२ डी सिनेमाव्दारे पार्श्वनाथ तीर्थंकर दर्शन, पार्श्वनाथ तीर्थंकर यांच्या जीवन कार्यावर आयोजित रिॲलिटी शो, देशात प्रथमच थ्री डी व्दारे १४ कुलकर यांचे जीवन चरित्र दर्शन, रोज ३३३३ इंद्र, इंद्राणी व्दारा महापंचकल्याणक अर्चना, जगात प्रथमच ९९९९ हवन कुंड व्दारा विश्वशांती महायज्ञ, १००८ मुलांचा मुंज संस्कार, २६ जानेवारी रोजी ४०५ फूट उंचीचा तिरंगा ध्वज फडकवणे, नवग्रह तीर्थंकर यांच्या वर हेलिकॉप्टर व्दारा पुष्पवृष्ट्री, आंतरराष्ट्रीय कवी संमेलन, २७ विशेष द्रव्याव्दारे तीर्थंकर पार्श्वनाथ भगवान मूर्तीचा महा
मस्तकाभिषेक सोहळा, १००८ नैवेद्य,पुष्प,फळ, दीप व्दारा जिनेंद्र महा अर्चना, १००८
श्रावक श्राविका व्दारे श्री पार्श्वनाथ दिव्य
पडगाहन व आहारदान, जैन साहित्य संमेलन, विशाल नऊ महामंत्र प्रतिष्ठापना, काच भूल भुलैय्या चे उद्घाटन, जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान तसेच तेवीसावे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांच्या जीवन कार्यावर आधारित संग्रहालय याचे उद्घाटन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तिर्थाटना तून पर्यटन करण्यासाठी श्री दिगंबर जैन नवग्रह तीर्थक्षेत्र विकसित करण्यात आले असून हे जैन धर्म संस्कृतीचे मोठे केंद्र बनले आहे. या पंच कल्याणक महोत्सवात सहभागी होण्यासाठी ९४८२०५५३११/ 9482055311 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शेवटी श्री धर्मसेन भट्टाचार्य महास्वामी यांनी केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन हुमड दिगंबर जैन संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा व विधीज्ञ दर्शन शहा यांनी केले.