टेक्निकल च्या प्राचार्यपदी श्री भगवान भिसे यांची नियुक्ती
.श्री भिसे सरांची एकूण सेवा 34 वर्ष झाली

टेक्निकल च्या प्राचार्यपदी श्री भगवान भिसे यांची नियुक्ती
श्री भिसे सरांची एकूण सेवा 34 वर्ष झाली
बारामती वार्तापत्र
रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयाच्या प्राचार्य पदी श्री भगवानराव भिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्या वर्षभरापासून प्रभारी प्राचार्य म्हणून श्री कल्याण देवडे कार्यभार सांभाळत होते.
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने रिक्त असलेल्या जवळजवळ 125 पदांवर पदोन्नती देऊन मुख्याध्यापक पदावर निवड करण्यात आली आहे.यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे यांनी बुके देऊन सरांचे स्वागत केले.श्री.भिसे सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थांनी शालेय शिस्तीचे पालन करत गुणवत्ता संपादन करण्याचे आवाहन केले.
तसेच शाळेचा असलेला नावलौकिक सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने वाढवण्याचा मनोदय सरानी व्यक्त केला.श्री भिसे सरांची एकूण सेवा 34 वर्ष झाली असून रयत शिक्षण संस्थेच्या चारही विभागात सरानी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिलेले आहे.
यापूर्वी ते शंकरराव ढोणे विद्यालय गराडे या ठिकाणी कार्यरत होते.सरांच्या या निवडीबद्दल स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री सदाशिव(बापू) सातव यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.