
टेक्निकल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
134 व्या जयंतीनिमित्त अभिवादन
बारामती वार्तापत्र
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनियर कॉलेज या विद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 134 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले .
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री भगवान भिसे उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे तसेच पर्यवेक्षिका सौ. अलका चौधर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य भगवान भिसे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती सांगितली.
भारतीय राज्यघटना निर्माण करण्यामध्ये बाबासाहेबांची असलेली महत्त्वाची भूमिका व्यक्त करत त्यांनी त्यांच्या जीवनाकार्यातील अनेक प्रसंग नमूद केले.
श्री कल्याण देवडे यांनी बाबासाहेब यांना अपेक्षित असलेली स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वाची माहिती दिली.यावेळी विद्यालयातील श्री अविनाश कोकरे ,शशिकांत फडतरे, प्रवीण राठोड, ज्येष्ठ शिक्षिका सौ. जयश्री हिवरकर, मीनाक्षी वाघमारे ,श्री लालासाहेब आडके,श्री अभी पाटील,श्री निभोरे तसेच अनेक सेवक उपस्थित होते.