शैक्षणिक

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बीबीए सीए विभागांतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअर संधी विषयक एक दिवसीय सेमिनार संपन्न

सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बीबीए सीए विभागांतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअर संधी विषयक एक दिवसीय सेमिनार संपन्न

सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग

बारामती वार्तापत्र 

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या बीबीए (सीए) विभागातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व बँकिंग, विमा आणि सरकारी क्षेत्रातील करिअर संधी या विषयावर एक दिवसीय सेमिनार प्रेरणा भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रा.माधुरी सस्ते, विभागप्रमुख बीबीए (सीए) यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

प्रमुख पाहुणे म्हणून सारिका शहा, संचालक, उन्नती एज्युकेशन, बारामती या होत्या. सारिका शहा यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग, विमा आणि सरकारी नोकरीतील संधी, स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, पात्रता निकष, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, यशस्वी उमेदवारांचे अनुभव, परीक्षेतील महत्वाचे टप्पे आणि मुलाखतीसाठी तयारी यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.

प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, कोणते स्रोत वापरावेत, कोणती पुस्तके व ऑनलाईन प्लॅटफॉर्म फायदेशीर ठरतात, परीक्षेत वेळेचे नियोजन कसे करावे, तसेच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक गोष्टी याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी मार्गदर्शन केले तर कार्यशाळेचे कोऑर्डिनेटर म्हणून सलमा शेख यांनी काम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!