इंदापूर

द्राक्ष बागायतदारांनी खचून न जाता नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा – बसवराज बिराजदार

प्लॅस्टिक आच्छादनाच्या चाचण्या घेण्यात येणार

द्राक्ष बागायतदारांनी खचून न जाता नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा – बसवराज बिराजदार

प्लॅस्टिक आच्छादनाच्या चाचण्या घेण्यात येणार

इंदापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन कृषी विभाग,महात्मा फुले कृषि विज्ञान केंद्र व इंदापूर तालुका शेतकरी उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विकेल ते पिकेल या अभियानाअंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट द्राक्ष विक्री केंद्राचा शुभारंभ शनिवारी (दि.२५) मौजे सरडेवाडी ता.इंदापूर या ठिकाणी संपन्न झाला.

प्रसंगी पुणे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार,राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ.रामहरी सोमकुंवर,बारामती उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे,तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपणवर यांनी द्राक्ष शेती बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बसवराज बिराजदार म्हणाले की, द्राक्ष बागायतदारांनी खचून न जाता नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास शिकले पाहिजे. मागील वर्षभरापासून द्राक्षबागा अवकाळी पावसापासून वाचण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादनाचा विषय चर्चेला जातो आहे. द्राक्ष बागायतदारांची अपेक्षा ५० टक्के खर्च सरकारने सोसावा अशी आहे. येत्या आठवड्याभरात सदरील विषय सरकार समोर मांडून सोडवणार आहे.त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर विभागवार प्लॅस्टिक आच्छादनाच्या चाचण्याही घेण्यात येणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

तसेच राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. रामहरी सोमकुंवर यांनी संशोधन केंद्राचे महत्त्व बागायतदारांना विशद केले व संशोधन केंद्रावर चाललेल्या संशोधनाचा लाभ घेण्याचेही त्यांनी सांगितले.शेतकरी उत्पादक संघाला द्राक्षापासून बनविण्यात येत असलेल्या विविध पदार्थांबद्दल तांत्रिक मार्गदर्शन करण्याची तयारी त्यांनी दाखविली. महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी द्राक्ष निर्याती बरोबरच द्राक्षाचे मूल्यवर्धित उत्पादन शेतकरी उत्पादक संघामार्फत ग्राहका पर्यंत पोहोचणार असल्याचे सांगितले.

यावेळी चंद्रकांत साळुंखे-माळी, सतीश शिंदे, अक्षय माळी, नंदू घाडगे-माळी,संतोष जाधव,उमेश घोगरे, नाना ताटे, बापुराव मदने, गणेश पांढरे, विष्णु हरणावळ, अतुल मोरे,सागर हरणावळ, अक्षय हरणावळ तसेच तालुक्यातील द्राक्ष बागायतदार,कृषी विभागातील अधिकारी,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र वाघमोडे,सुधीर वाघमोडे यांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram