क्राईम रिपोर्टस्थानिक

मेखळीतील युवकांनी उभारला कोरोनाविरुद्ध लढा…

सामाजिक भान असलेल्या युवकांनी एकत्र येऊन 'मेखळी कोविड योद्धा' ग्रुप सुरु केला

मेखळीतील युवकांनी उभारला कोरोनाविरुद्ध लढा…

सामाजिक भान असलेल्या युवकांनी एकत्र येऊन ‘मेखळी कोविड योद्धा’ ग्रुप सुरु केला

मेखळी :बारामती वार्तापत्र

सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातले असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना रुग्णांना वेळेवर बेड, आक्सिजन बेड , व्हेंटिलेटर,प्लाज्मा, रक्त व औषधे यांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच बऱ्याच लोकांनपुढे या गोष्टी उपलब्ध कशा करायच्या याचेदेखील मोठे आव्हान असते. ही बाब लक्षात घेऊन मेखळी गावातील व परिसरातील गरजू रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी बारामती तालुक्यातील मेखळी येथे ‘मेखळी कोविड योद्धा’ या ग्रुपच्या माध्यमातून गावातील युवक पुढे सरसावले आहेत.

मेखळी गावातील सामाजिक भान असलेल्या युवकांनी एकत्र येऊन ‘मेखळी कोविड योद्धा’ ग्रुप सुरु केला आहे .ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागात गेल्यानंतर कोरोनाचे उपचार व औषधे उपलब्ध करण्यासाठी अडचणी येत होत्या हि बाब लक्षात घेऊन रुग्णांना व कुटुंबियांना आधार देण्यासाठी या ग्रुपची स्थापना झाली.यामध्ये गावातील वैद्यकीय प्रतिनिधी, मेडिकल(केमिस्ट) व इतर व्यावसायिक,नोकरदार तसेच पदाधिकारी यांचा समावेश आहे.यांच्या माध्यमातून गावातील व परिसरातील .. साधे बेड,..ऑक्सिजन बेड ,..व्हेंटिलेटर बेड,.. रुग्णांना प्लाझ्मा तसेच ..रुग्णांना अंड्याचे ट्रे,..अक्टिव्ह रुग्णांना वाफेचे मशीन,फॅबीफ्लु व विट्यामीन डी गोळ्या व जेवणाचे डब्बे पोहचवण्यात आले असून पुढील मदतकार्य चालू आहे.त्याचबरोबर जी औषधे सहज उपलब्ध होत नाहीत ती ग्रुपमधील वैद्यकीय प्रतिनिधी त्यांच्या संपर्कातून उपलब्ध करून देऊन रुग्णांना सहकार्य करतात.


परिचारिका दिनानिमित्त ग्रुपच्या वतीने गावातील परिचारिका,आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचा मास्क,सॅनिटायझर,फेसशिल्ड व हॅण्डग्लोज देऊन सन्मान करण्यात आला. या ग्रुपच्या कामाला पाठबळ देण्यासाठी पांडुरंग कचरे यांनी स्वतःची रुग्णवाहिका कोरोना काळात वापरण्यासाठी दिली आहे तर गावातील व परिसरातील लोकांनी देखील आर्थिक व इतर स्वरूपात मदत केली आहे.

Related Articles

Back to top button