प्रा.डॉ. भोर सर यांनी शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले -हर्षवर्धन पाटील
"तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार "

प्रा.डॉ. भोर सर यांनी शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले -हर्षवर्धन पाटील
“तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ”
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कला शाखा प्रमुख व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भिमाजी काशिबा भोर यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमाचे व अर्थशास्त्र विभागातील माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शाहीर अमर शेख सभागृह येथे करण्यात आले होते. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, प्रा. डॉ. भोर सर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रा.डॉ.भोर आणि त्यांच्या पत्नी कल्पना भोर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.प्रा. डॉ. भिमाजी भोर यांनी सहकार्याच्या भावनेतून इंदापूर महाविद्यालयासाठी 30 मंच ( podium,dais) दिले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ नव्या पिढीने प्रा. डॉ. भोर सर यांचा आदर्श घ्यावा. भोर सर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. दृढ निश्चय करीत आपले शिक्षण पूर्ण केले तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. समाज अर्थ साक्षर होणे काळाची गरज असून भोर सर यांनी पुढे या क्षेत्रात प्रबोधन करावे.
यावेळी संस्थेचे संचालक विलासराव वाघमोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रा. डॉ.भिमाजी भोर सर म्हणाले की,’ आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना ‘तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ‘ या वृत्तीतून संघर्ष करीत शिक्षण पूर्ण केले. मोठे भाऊ यांनी इंदापूर येथे अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करण्याची संधी दिली. आपणा सर्वांच्या सहकार्याने विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून मी शिक्षण क्षेत्रात कार्य केले आहे.
यावेळी संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी , सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके , संचालक तुकाराम जाधव , गणपत भोंग , सुरेश मेहेर तसेच मेघ:शाम पाटील , धनंजय पाटील , प्रा. कृष्णाजी ताटे , विशाल बोंद्रे ,अंकुश पाडुळे , उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे,आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव लोंढे ,पारगाव वि.का.सो.चे चेअरमन रमेश बोत्रे , सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.हरिभाऊ भोर ,डॉ. राजाराम तांबे, ग्रामसेवक अनंथा तांबे , वळती वि.का. सो.चे चेअरमन नारायण भोर , डीआरडीओ चे संशोधक निवृत्ती वाळुंज , निवृत्ती मुळे , रामदास मस्के , सौरभ वाळुंज , हरिदास मस्के , संतोष भोर , डॉ. अनिल खरमाळे , चंद्रकांत भोर , दत्तात्रय सुर्वे , सामाजिक कार्यकर्ते निमेष पोटकर उपस्थित होते.
अर्थशास्त्र विभागाचे प्रा. शाम सातारर्ले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांनी आभार मानले.प्रा. डॉ. भिमाजी भोर यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी यावेळी मोठ्या संख्येने समूदाय उपस्थित होता.