बनावट दस्तऐवजाच्या आधारे पुणे जिल्ह्यातील वेग वेगळ्या परिसरात फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेल्या नगर रचना विभागाचे निलंबित सह संचालकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण पथका कडून अटक
नाकींदा महाबळेश्वर परिसरात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतला

बनावट दस्तऐवजाच्या आधारे पुणे जिल्ह्यातील वेग वेगळ्या परिसरात फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेल्या नगर रचना विभागाचे निलंबित सह संचालकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण पथका कडून अटक
नाकींदा महाबळेश्वर परिसरात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतला
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशन गुरनं 644/2020भा.द.वि कलम 417, 467, 468 नुसार गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्हयातील अरोपी तात्काळ अटक करणेसाठीच्या सूचना वरिष्ठांन कडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नगर रचना विभागाचे निलंबित सह संचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर, वय. 55 वर्ष रा. स्वप्नशिल्प सोसायटी कोथरूड पुणे* हे गुन्हा दाखल झाले पासुन फरारी होते. पुणे शहर,पुणे ग्रामीण आणी नवी मुंबई या ठिकानी गुन्हे दाखल असल्यामूळे ते 1महिन्या पासुन पोलिसाना गुंगारा देत होते. Lcb पुणे ग्रामीण पथक त्यांचा पुणे नगर सतारा परिसरात कसोशीने शोध घेत होते. परंतू सदरचा आरोपी हा उच्च पदस्त अधिकारी असल्याने तो पोलिसाना गुंगारा देत होता. सदर आरोपी याला अटक करणे साठी मा.अभिनव देशमुख सो , पोलीस अधिक्षक पुणे ग्रा. यानी एक खास पथक तयार केले होते. सदर पथकाने आरोपीचे ठाव ठिकाण्याबाबत काही एक धागादोरा मिळत न्हवता. पुणे सातारा जिल्ह्यातील आरोपीचे वास्तव्याची ठिकाणे सी.सी.टि.वी. फूटेजेस तपासणी करीत असताना, नमुद आरोपी हा महाबळेश्वर जि.सातारा परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सदर ठिकाणी जावुन त्याचा शोध घेतला असता, तो नाकींदा महाबळेश्वर परिसरात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले असून पुढील तापसाकामी बारामती शहर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
आरोपीवर दाखल गुन्ह्याची माहिती खालील प्रमाणे
1)दत्तवाडी पो.स्टे पुणे शहर गु.र.नं. 223/17 भादवि 420,406,465,468वगैरे
2)अलंकार पो.स्टे पुणे शहर गु.र.नं 736/20भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम1988चे कलम 13(1)ब,2,109
3)ए.पी.एम.सी पो.स्टे नवी मुंबई गु.र.नं53/21 भा.द.वि कलम420,465,468वगैरे अन्वये गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा.श्री अभिनव देशमुख सो. मा. अप्पर पोलीस अधिक्षक मोहिते सो,यांच्या मार्गदर्शना नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे व.पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट ,सपोनि सचिन काळे ,पो उप.निरीक्षक रामेश्र्वर धोंडगे,सफौ. दत्तात्रय गिरमकर ,पो हवा अनिल काळे,पो हवा रविराज कोकरे,पो हवा उमाकांत कुंजीर,पो हवा जनार्दन शेळके ,पो हवा प्रमोद नवले ,पो हवा. ,सचिन गायकवाड, पोना राजू मोमीन,पोना अजित भुजबळ
पोना मंगेश थिगळे,पो ना महेंद्र कोरवी यांनी केली आहे.