बारामतीतील कऱ्हा आणि नीरा नदी पात्रात अतिक्रमणाचा सुळसुळाट..
कऱ्हा नीरा नदीच्या अतिक्रमणामुळे अनेक गावे धोक्यात..
बारामतीतील कऱ्हा आणि नीरा नदी पात्रात अतिक्रमणाचा सुळसुळाट..
कऱ्हा नीरा नदीच्या अतिक्रमणामुळे अनेक गावे धोक्यात..
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील कऱ्हा आणि नीरा या दोन नद्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. यामुळे या नद्यांचा जीव गुदमरू लागला आहे त्याचच वाळूमाफियांनी खोदलेल्या मोठ मोठ्या खड्डयांनी नद्यांचे पात्रच बदलून गेले आहे.
याकडे बारामतीचे तहसीलदार आणि महसूल अधिकारी यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मात्र या त्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक गावांतील नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो हे मात्र नक्की आहे गावात नद्यांचे पाणी शिरून काही आपत्ती आल्यास याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार असतील.
गेल्या दोन वर्षांपासून कऱ्हा आणि नीरा या दोन्ही नद्यांना पावसाळ्यात महापूर आलेला होता यात बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये नदीला आलेल्या महापुराचे पाणी शिरले होते. यात अनेक जणांचे संसार उपयोगी वस्तू, जनावरे, गाड्या डोळ्यादेखत वाहून गेल्या आहेत. हे फक्त होतंय नदी पात्रात झालेल्या अतिक्रमणामुळे? नदी पात्रात झालेल्या अतिक्रमणामुळे नद्यांचे पात्र बदलून ते गावाच्या दिशेने सरकू लागले आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास नद्यांचे पाणी नदी शेजारील गावांत शिरणार यात कुठलीच शंका नाही यामुळे अनेक गावातील नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. यामुळे आता कऱ्हा आणि नीरा या दोन्ही नदी पात्रात शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण बारामतीचे तहसीलदार आणि महसूल अधिकारी काढणार का? नद्यांचा गुदमरलेला श्वास मोकळा करणार का? भविष्यात नद्यांचे पाणी गावांत शिरण्यापासून रोखणार का? याकडे बारामती तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.