बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज येथे महिलांसाठी आरोग्य शिबिर चे आयोजन
आजार झाल्यास औषधोपचार व मानसिक रित्या कशी काळजी घ्यावयाची या बाबत शंका चे निरसन

बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज येथे महिलांसाठी आरोग्य शिबिर चे आयोजन
आजार झाल्यास औषधोपचार व मानसिक रित्या कशी काळजी घ्यावयाची या बाबत शंका चे निरसन
बारामती वार्तापत्र
बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडीकल कॉलेज व अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दि.१७ फेब्रुवारी रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले यांचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी अ.भा.म.महासंघ तालुका अध्यक्षा ॲड.सुप्रिया बर्गे, बारामती शहर अध्यक्षा अर्चना सातव, ॲड.विणा फडतरे, ज्योती जाधव, नम्रता ढमाले, प्रियंका जराड, अर्चना ढुके, हर्षदा सातव.चैत्राली तावरे,अलका मोता.अंजली वणवे उपस्तीत होत्या महिलांची कर्करोग तपासणी,थाॅयराइट, तपासणी करण्यात आली .
महिला डॉ. पुंडकर व डॉ.शेट्टी यांनी उपस्तीत महिलांना मार्गदर्शन केले व महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी व आजार झाल्यास औषधोपचार व मानसिक रित्या कशी काळजी घ्यावयाची या बाबत शंका चे निरसन केले.