बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अडीच एकर पीक जळाले; युगेंद्र पवारांची पाहणी
तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अडीच एकर पीक जळाले; युगेंद्र पवारांची पाहणी
तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे शॉर्ट सर्किटमुळे शेताला आग लागून सुमारे अडीच एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
आगीत शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. युगेंद्र पवार यांनी घटनास्थळी जाऊन आगीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून घटनेची माहिती जाणून घेतली.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्त पिकांचा तातडीने पंचनामा करण्याची मागणी केली. पंचनाम्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करून शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






