क्राईम रिपोर्ट

सकाळी बाइक पेट्रोलिंग, संध्याकाळी पायी गस्त! बारामतीत तालुका पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन!

कॅफेचालकांनो सावधान! अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश नको

सकाळी बाइक पेट्रोलिंग, संध्याकाळी पायी गस्त! बारामतीत तालुका पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन!

कॅफेचालकांनो सावधान! अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश नको

बारामती वार्तापत्र 

शहरातील गर्दीच्या आणि वर्दळीच्या भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बारामती तालुका पोलिसांनी विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवले. सकाळी मोटारसायकल पेट्रोलिंगद्वारे कारवाई करण्यात आली, तर सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत विविध भागांमध्ये पायी पेट्रोलिंग करून पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

या मोहिमेत सूर्यनगरी, तांबे नगर, मेडिकल कॉलेज, विद्या प्रतिष्ठान आणि एमआयडीसी परिसरात पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले. रस्त्यांवर विनाकारण थांबणारे रोड रोमिओ, रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त वाहने पार्क करणारे तसेच फुटपाथवर स्टॉल लावून नागरिकांच्या रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्यांना पोलिसांनी तंबी देत आवश्यक कारवाई केली.

विशेष म्हणजे, कॅफेचालकांनाही पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कॅफेमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना बसू देऊ नये, तसेच बंदिस्त केबिन ठेवू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या. नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या विशेष मोहिमेमुळे शहरातील गर्दीच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढली असून, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे आणि सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

 

Back to top button