बारामती तालुक्यातील दक्षता समितीची पहिली सभा संपन्न
अध्यक्षांसह सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.

बारामती तालुक्यातील दक्षता समितीची पहिली सभा संपन्न
अध्यक्षांसह सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
बारामती वार्तापत्र
मा. जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशान्वये बारामती तालुक्यातील शहर व ग्रामीण सार्वजनिक वितरण व्यवस्था ( पुरवठा) यांची दक्षता समितीची पहिली सभा 30 जून 2021 रोजी तहसिल कार्यालय, बारामती येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली .
यावेळी पंचायत समिती सभापती निता फरांदे , गटविकास अधिकारी राहूल काळभोर बारामती शहर दक्षता समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, सदस्य रहेना शिकीलकर, रेश्मा ढोबळे, सुशांत सोनवणे , सचिन माने, मधुचंद्र नागवडे, विरधवल गाडे, शौकत बागवान, बाळासाहेब चव्हाण तसेच बारामती ग्रामीण दक्षता समितीचे अध्यक्ष पोपट पानसरे, सदस्य सुचिता साळवे , गौरी काटे, सुनिता खोमणे, सुनिल कांबळे , नायब तहसिलदार महादेव भोसले, एस.व्ही.देष्ट्येवाड, मनिषा चव्हाण उपस्थित होते.
तहसिलदार पाटील यांच्या हस्ते प्रथम दोन्ही अध्यक्षांसह सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. यानंतर तहसिलदार पाटील यांनी दक्षता समितीच्या सर्व उपस्थित सदस्यांना बारामती तालुक्यातील पुरवठा विभागाचे कामकाज व रास्तभाव दुकानांची संख्या, अंत्योदय शिधापत्रिका, अन्न सुरक्षा शिधापत्रिका , पॉस मशिन, प्रधानमंत्री गरीब अन्नयोजना, बारामती तालुक्यातील रास्तभाव दुकाने तसेच महिन्याला प्राप्त होणारे धान्य व त्याचे वितरण याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच प्रत्येक दक्षता समितीच्या सदस्याला ओळखपत्र देण्यात येईल व तालुक्यातील सर्व रास्तधान्य दुकानदारांनी आपल्या दुकानामध्ये दक्षता समितीच्या सदस्यांची नावे व मोबाईल नंबर असलेला बोर्ड लावावा, असेही ते यावेळी म्हणाले. दक्षता समिती सदस्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात व्यवस्थित धान्य पुरवठा होत नसल्यास सदरची माहिती तात्काळ तहसिल कार्यालयास कळवावी अशी , सूचनाही त्यांनी यावेळी केली.