
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर
एफआरपी २६०५ रुपये
बारामती वार्तापत्र
चालू गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाला टनाला २८०० रुपये पहिली उचल जाहीर केली असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे (दि.३१) डिसेंबर २०२४ पर्यंत गाळपााठी आलेल्या उसाचा पहिला उचल (दि.१०) जानेवारी २५ रोजी सभासदांना अदा करण्यात येणार आहे. कारखान्याची एफआरपी २६०५ रुपये असून यामध्ये अधिकचे टनाला १९५ रुपये जादा अदा करण्यात येत आहेत.
एफआरपीच्या नव्या सूत्रानुसार १०.२५ टक्के उताऱ्यानुसार एफआरपीचा पहिला हप्ता दिला जातो. हंगाम संपल्यानंतर अंतिम साखर उतारा निश्चित झाल्यावर एफआरपीची अंतिम रक्कम निश्चित होते. हंगाम संपल्यावर पंधरा दिवसांत एफआरपीचा उर्वरित फरक देणे बंधनकारक आहे. यानुसार सोमेश्वरची अंतिम एफआरपी ३१२० ते ३१५० च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उर्वरित ३२० ते ३५० रुपये हंगाम संपल्यावर दिले जाणार आहेत.
अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, सद्या पहिल्या उचलीपोटी टनाला २८०० रुपये देत आहोत. कारखाना बंद झाल्यावर एफआरपी ३२० ते ३५० रुपये उर्वरित फरक दिला जाणार आहे. हा दर देत असताना दरवर्षीप्रमाणे सोमेश्वर कारखाना राज्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत अंतिम दराबाबत कुठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.